fbpx
Thursday, April 25, 2024
LIFESTYLE

‘इंदिरा आयव्हीएफ’ने ओलांडला 75 हजार ‘आयव्हीएफ गर्भधारणा’ यशस्वीपणे घडवून आणण्याचा महत्त्वाचा टप्पा

मुंबई, दि . 16 – वंध्यत्व उपचार क्लिनिकची भारतातील आघाडीची साखळी असणाऱ्या  ‘इंदिरा आयव्हीएफ’ने आपले वैद्यकीय कौशल्य व तंत्रज्ञान यांच्या आधारे आतापर्यंत 75 हजार यशस्वी ‘आयव्हीएफ गर्भधारणा’ घडवून आणल्या आहेत.

एका विशिष्ट उद्देशानुसार चालणारी आरोग्यसेवा संस्था म्हणून, ‘इंदिरा आयव्हीएफ’ने भारतातील दुर्गम भागांमध्ये वंध्यत्वावरील उपचार पोहोचविले आहेत व याचा या संस्थेला अभिमान आहे. 2011 मध्ये स्थापना झाल्यापासून देशभरातील 94 केंद्रांमध्ये एक लाखांहून अधिक प्रक्रिया केल्यानंतर, इंदिरा आयव्हीएफ ही आज देशातील सर्वात मोठी व विश्वासार्ह अशी प्रजनन क्षेत्रातील रुग्णालयांची श्रृंखला बनली आहे.

‘इंदिरा आयव्हीएफ’चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. अजय मुर्दिया म्हणाले, “आमच्या कामातून आम्ही ज्या कुटुंबांना दिलासा मिळवून दिला आहे, त्यांच्याबद्दल विचार करताना आम्हाला अतीव समाधान वाटते. आपल्या समाजात वंध्यत्वाकडे ज्या दृष्टीने पाहिले जाते, ती दृष्टी बदलण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत. वंधत्वाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आज अनेकजण वैद्यकीय शास्त्राकडे वळत आहेत, हे पाहून समाजाच्या दृष्टिकानात बदल झाल्याचे आम्हाला जाणवते आणि त्याचा अभिमान वाटतो.”

‘इंदिरा आयव्हीएफ’चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. क्षितिज मुर्दिया म्हणाले, “क्लिनिकमध्ये आयव्हीएफ प्रक्रिया यशस्वी करण्यावर आमचा भर असल्याचे या सर्व यशोगाथांमधून दिसून येते. आमचे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान हे आमच्या उद्दिष्टांसाठी उत्प्रेरक बनेल, याची आम्ही नेहमीच खातरजमा करीत असतो. नवीनतम आरोग्यसेवा तंत्रज्ञानाचा अवलंब करीत, आम्ही अगदी कमी कालावधीत आपल्या संस्थात्मक कौशल्यांमध्ये मोठे बदल केले आहेत. आम्ही आमची प्रगती आणि महत्वाकांक्षा वाढविण्यासाठी मागील वर्षी एक मजबूत टीम नेमली. ‘इंदिरा आयव्हीएफ’मधील आमच्या कामात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असण्यावर आमचा भर असतो.”

संस्थेच्या अभूतपूर्व प्रवासाविषयी बोलताना ‘इंदिरा आयव्हीएफ’चे सह-संस्थापक आणि संचालक नितिज मुर्दिया म्हणाले, “गेल्या काही वर्षांत आयव्हीएफ उपचारांच्या यशस्वीतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, कारण बहुसंख्य जोडप्यांना पहिल्याच चक्रातच गर्भधारणा होऊ शकली आहे. वंध्यत्व आणि आयव्हीएफ उपचारांशी संबंधित कलंक आणि दंतकथा कमी करण्याच्या दृष्टीने, एक परिणाम साध्य केल्याचाही आम्हाला अभिमान आहे. देशाच्या दुर्गम भागात आम्ही आपल्या कामातून सकारात्मक परिणाम यापुढेही साधत राहू.”

अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी सज्ज असणारी इंदिरा आयव्हीएफ ही संस्था असंख्य जोडप्यांना वंध्यत्वाच्या गुंतागुंतीच्या उपचारांमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन करते आणि त्यांचे कुटुंब सुरू करण्याचे स्वप्न साकार करण्यास मदत करते. तसेच वयाच्या चाळीशीपर्यंत कुटुंब नियोजन करू इच्छिणाऱ्या अनेक तरूण स्त्री-पुरुषांना नंतर सोयीचे ठरण्याच्या दृष्टीने, त्यांचे शुक्राणू व स्त्रीबीज अतिशीत अवस्थेत साठवून ठेवण्याकरीता सल्ला देण्याचे कामही ही संस्था करते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading