fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRAPUNETOP NEWS

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना भारतरत्न द्यावा – रामदास आठवले

पुणे, दि. १३ – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना भारतरत्न मिळावा . महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन ,दलित समाजाला सुमारे 100 वर्षांपूर्वी शिक्षणाची दारे खुली केली ,विविध सुधारणा घडवून आणल्या परंतु त्यांचे कार्य अजूनही दुर्लक्षित राहीले आहे अशा थोर महापुरुषाला भारतरत्न मिळाला पाहिजे तसेच साहित्य विश्वात उपेक्षित ,दलित ,कष्टकरी समाजाचे दुःख ,वेदना मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाही भारतरत्न मिळावा असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृह व ग्रंथालय उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.

महर्षी वि.रा.शिंदे यांनी केलेल्या डिप्रेस्ड कलास मिशन संस्थेस
125 वर्ष पूर्ण नुकतेच झाले.त्यानिमित्त
ग्रंथालय व बहुद्देशीय सभागृहाचे उदघाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले झाले त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की महर्षी शिंदे यांनी ज्या काळात उपेक्षित ,दलित यांना शिक्षण मिळू दिले जात नव्हते त्या काळात त्यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन संस्था स्थापन करून फार मोठे ऐतिहासिक कार्य केले आहे .त्यामुळे ही वास्तू चा सन्मान होण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कडून विशेष निधी मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले.
आमदार सुनील कांबळे यांनी या संस्थेचा ठेवा जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


संस्थेचे सचिव एम.डी. शेवाळे यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात महर्षी विट्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या या संस्थेची माहिती दिली. व महर्षी शिंदे यांना भारतरत्न देण्यासाठी खा.रामदास आठवले यांनी आग्रह धरण्याची मागणी केली.तसेच या संस्थेच्या शाखा देशभरात पोहचल्या असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास आमदार सुनील कांबळे , नगरसेविका सोनाली लांडगे , नगरसेविका फरजाना शेख , माजी मंत्री दिलीप कांबळे , रिपब्लिकन मातंग आघाडी चे प्रदेशादयक्ष हनुमंत साठे , रिपब्लिकन अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आयुब शेख विशाल शेवाळे , प्राचार्या शिल्पा भोसले यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading