fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

Big Breaking – ‘सीरम’ इन्स्टिटयूटच्या नवीन इमारतीमध्ये आग

पुणे, दि. 21 – कोरोना लस निर्माण करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये आग लागली आहे. आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असल्याचे अग्नीशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.

अग्निशमन दलाने सांगितले की, आज दुपारी एकच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीतच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. या इमारतीत बीसीजीच्या लासिचे काम सुरूअसून येथे लॅब आहे. मात्र आगीचे नेमके कारण काळू शकलेले नाही. मांजरी परिसरात असणाऱ्या नवीन युनिटमध्ये ही आग लागली आहे. त्याचे स्वरूप भीषण असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

केंद्राने मागितला अहवाल

‘कोव्हीशिल्ड’ या करोना लसीच्या निर्मितीमुळे सीरम इन्स्टिट्यूटकडे भारताचेच नव्हे तर जगभराचे लक्ष आहे. भारतात लासिकरणाला काही दिवसांपूर्वीच सुरूवात झाली असून सध्या सीरम इन्स्टिट्यूटला कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहेत. अशातच आगीची घटना घडल्याने या मागे काही घातपाताची शक्यता आहे का? अशी शंका येत असल्याने केंद्राने आगीचा अहवाल मागवला असल्याचे, सूत्रांनी सांगितले आहे.

‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या उत्पादनाला कोणताही धोका नाही- अमिताभ गुप्ता, पुणे पोलिस आयुक्त

” आज दुपारी आगीची बातमी समजल्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली असून ती विझवण्याचे काम सुरू आहे. अजूनतरी कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. इमारतीच्या छतावर चार जण अडकले होते त्यांना वाचवण्यात यश आले आहे. ‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या उत्पादन येथे होत नव्हते त्यामुळे या लसीच्या उत्पादनाला कोणताही धोका नाही.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading