fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

धर्माच्या भिंती ओलांडून साजरे झाले समरसतेचे बोरन्हाण

पुणे, दि. १७ – समाजात तेढ निर्माण करणा-या धर्माधर्मातील विचारांच्या भिंती ओलांडून पुण्यातील दोन गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येत समरसतेचे बोरन्हाण साजरे केले. शहराच्या पूर्व भागात हिंदू व मुस्लिम धर्मातील चिमुकल्यांना एकत्रित करुन त्यांना बोरन्हाणाचा आनंद कार्यकर्त्यांनी मिळवून दिला. यामध्ये सर्वधर्मातील महिलांनी सहभाग घेत चिमुकल्यांवर बोरं, चॉकलेटस्, चुरमुरे यांसह रानमेव्याचा वर्षाव केला. धर्माच्या भिंती ओलांडून साजरे झालेले हे बोरन्हाण पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. 

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट व भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्र मंडळातर्फे भवानी पेठेतील निशांत टॉकिजसमोर समरसतेचे बोरन्हाण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा सहस्त्रबुद्धे, प्रल्हादभाऊ थोरात, पियुष शाह, पूनम वरनदानी, गोविंदा वरनदानी, नरेंद्र व्यास, गंधाली शाह, हर्षा आडतानी, निसारभाई शेख, ऋत्विक अडमुलवार, कुमार शिंदे, जिया खान, जारा खान, विजय पुर्शनानी आदी उपस्थित होते. तिरंगी पतंगांची आकर्षक आरास देखील याठिकाणी करण्यात आली. 

अनुराधा सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, बोरे वजनाने कमी असल्याने त्याने लहान मुलांना न्हाण घातल्यानंतर डोक्यातील मेंदुचे पॉईंटस चार्ज होतात. तसेच बोरे हा गावरान मेवा असल्याने आंबटगोड चवीमुळे लहान मुलांचे जे दुधाचे दात सळसळत असतात, त्याला देखील व्यायाम मिळतो. संक्रांतीनिमित्त लहानग्या मुलांच्या प्रतिकारशक्ती व उत्तम आरोग्याकरिता बोरन्हाण केले जाते. समरसतेचे हे बोरन्हाण समाजासमोर आदर्श निर्माण करणारे आहे. 
प्रल्हाद थोरात म्हणाले, समाजामध्ये एकतेचा संदेश पोहोचावा आणि आजच्या पिढीला आपण एकीचे महत्व पटवून द्यावे, याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लहानपणापासून मुलांमध्ये एकमेकांविषयी द्वेष निर्माण करता, धर्माच्या भिंती ओलांडून एकमेकांना सहाय्य करण्यास पुढे येण्याची शिकवण देण्याचा प्रयत्न आम्ही यामाध्यमातून करीत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading