fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी राजू इंगळे; कार्यवाहपदी सुनील चोरे

पुणे : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ उर्फ राजू इंगळे यांची निवड करण्यात आली. कार्यवाहपदी सुनील चोरे, खजिनदारपदी संतोष घारे, उपाध्यक्षपदी अनिल खेतमाळीस, अलकनंदा पाटील, सहकार्यवाह व माजी विद्यार्थिनी समन्वयक म्हणून मनीषा गोसावी, तर सहखजिनदार व माजी विद्यार्थी समन्वयक म्हणून गणेश काळे यांची निवड झाली. समितीचे विश्वस्त रमाकांत तांबोळी यांची मंडळाच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.

मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. या पदाधिकाऱ्यांसमवेत माजी विद्यार्थी जीभाऊ शेवाळे, दिनकर वैद्य, मनोज गायकवाड, डॉ. अभय व्यवहारे, निसार चौगुले, रेवती गटकळ, शंकर बारवे, ऍड. देविदास टिळे, जीवराज चोले यांची सदस्य म्हणून निवड झाली. मावळते अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडून निर्वाचित अध्यक्ष इंगळे यांनी पदभार स्वीकारला.

कुंदन पठारे, श्रुती साने, गजानन देशपांडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, ज्येष्ठ सदस्य रत्नाकर मते, हरीश बुटले, डॉ. प्रसाद आंबीकर, तुषार रंजनकर, ज्ञानेश्वर खैरे, संदीप इंगवले व अन्य माजी विद्यार्थी, पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading