fbpx
Thursday, April 25, 2024
SportsTOP NEWS

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका

कोलकाता – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे समोर आले आहे. कोलकाताच्या वूडलँड हॉस्पिटलमध्ये सौरव गांगुली यांना दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी सौरव गांगुली यांची तब्येत बिघडली होती. माहितीनुसार, सौरव गांगुली जिममध्ये वर्कआउट करत होते. ही जिम त्यांच्या घरीच आहे. जिम करत असताना त्यांचा छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना त्वरित वूडलँड हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे आज सायंकाळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading