fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

३८० गावातून १० हजार कि.मी.ची पदवीधर संपर्क मोहीम पूर्ण – ऍड. मंगेश महामुलकर

पुणे : पदवीधरांच्या भेटीगाठी आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ३८० गावातून १० हजार किलोमीटर ची पदवीधर संपर्क मोहीम पूर्ण केली असून पुणे पदवीधर मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती एड.मंगेश महामुलकर यांनी दिली.

‘ऑनलाईन शिक्षण सुविधा,स्पर्धा परीक्षा तयारीसाठी पायाभूत सुविधा आणि पोर्टल,उद्योग व्यवसायात स्थानिक पदवीधरांना प्राधान्य,सर्व वंचित समाज घटकांचे  आरक्षण कायम ठेवत मराठा समाजाला आरक्षण ,कृषी क्षेत्रासाठी बाजारपेठ अशा भूमिका आणि उपक्रमांनी पदवीधरांना प्रगतीची दिशा दाखवू . मतदारांनी पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे’,असे आवाहन उच्चविद्याविभूषित तरुण उमेदवार  एड.मंगेश महामुलकर यांनी आज पत्रकाद्वारे केले आहे .  

पुणे पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील उच्चविद्याविभूषित तरुण उमेदवार  एड.मंगेश महामुलकर यांनी अपक्ष उमेदवार या नात्याने आव्हान उभे केले असून समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून सातत्याने पदवीधरांच्या संपर्कात असल्याने  विजय मिळण्याची खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. आज पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. 
सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महामुलकर यांनी १० वर्षांपासून वृक्षवल्ली फौंडेशन,सृष्टी सामाजिक सेवा संस्था,लायन्स क्लब ,ग्राहक पंचायत अशा माध्यमातून सामाजिक काम केलेले आहे. पदवीधर तरुणासाठी रोजगार मार्गदर्शन मेळावे आयोजित केलेले आहेत. तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन केले आहे.वकिली व्यवसायाच्या माध्यमातून गरजूना-पीडितांना मोफत कायदेविषयक सल्ला दिलेला आहे. 
पुणे पदवीधर मतदार संघात वृक्षारोपण,शैक्षणिक साहित्य वाटप,गणवेश वाटप,आरोग्य शिबिरे,योगासन शिबिरे,नेत्र तपासणी,कर्करोग निदान शिबिरे,क्रीडा स्पर्धा असे उपक्रम आयोजित करून सातत्यपूर्ण संपर्क ठेवला आहे.
एड.महामूलकर म्हणाले,’पुणे पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य पदवीधरांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवित आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात पदवीधरांचे शिक्षणापासून ते नोकरी, व्यवसाय, उदयोग या प्रश्नांची सोडवणुक करणेसाठी पदवीधरांचा एक हक्काचा बुलंद आवाज सभागृहात माझे माध्यमातून जावा याकरिता मतदारांचा  पाठींबा व आर्शिवाद  पाठीशी ठामपणे रहावा अशी विनंती आहे’. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading