fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात आजही नव्या रुग्णांची संख्या 6 हजारांपेक्षा जास्त

पुण्यात 406 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण

मुंबई,  दि, 27 – राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना प्रादुर्भावात वाढ होत असून आजही कोरोना रुगणांची संख्या 6 हजारांपेक्षा जास्त आढळून आली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट झाली आहे.

महाराष्ट्रात आज 4 हजार 89 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण 16 लाख 72 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.48 टक्के एवढे झालं आहे. आज राज्यात 6 हजार 185 नवीन रुग्णांचे निदान झाले.

कोरोनाबाबत आज नेमकी कशी राहिली स्थिती?

– राज्यात आज 85 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद

– सध्या राज्यातील मृत्यूदर 2.59 टक्के एवढा आहे

– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 35 लाखाहून अधिक प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 8 हजार 550 (17टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

– सध्या राज्यात 5 लाखांहून अधिक व्यक्ती होम क्वारन्टाईनमध्ये आहेत तर 7 हजाराहून अधिक व्यक्ती संस्थात्मक क्वारन्टाईनमध्ये आहेत.

– राज्यातील ऍक्टिव्ह रुग्ण – राज्यात आज रोजी एकूण 87 हजार 969 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, मुंबई आणि पुण्यासह राज्यातील ग्रामीण भागातही दिवाळीनंतर कोरोना संसर्ग वाढीस लागला आहे. दिवाळीच्या काळात अनेक नागरिकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास केला. तसंच खरेदीसाठी बाजारपेठांमध्येही चांगलीच गर्दी झाली होती. परिणामी आता राज्यात कोरोनाबाधितांचे आकडे वाढताना दिसत आहेत. त्यामुळे यापुढील काळात तरी नागरिकांनी कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन शासन-प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

*lपुणे शहर ..!

  • दिवसभरात 406 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 320 रुग्णांना डिस्चार्ज.
  • 2 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
    168866
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-5401
  • एकूण मृत्यू – 4451
  • एकूण डिस्चार्ज- 159014

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading