fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTPUNE

कोथरूड नाट्य परिषदेचा यावर्षीचा यशवंत – वेणू पुरस्कार अभिनेते मोहन व ज्योती जोशी याना जाहीर

पुणे – यशवंतराव स्मृती दिना निमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे यशवंत वेणू पुरस्कार यावर्षी अभिनेते मोहन जोशी व त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना बुधवार २५ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ५:३० वा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड येथे देण्यात येणार आहे अशी माहिती कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली.

पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ५,००० मानपत्र पुणेरी पगडी शाल असे असून हा पुरस्कार जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते प्रशांत दामले , मराठी उद्योजक अमित गोखले, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पुणे महापालिका शिवसेने चे गटनेते पृथ्वीराज सुतार यांची विषेश उपस्थित असणार आहे.
याच कार्यक्रम पुण्यातील covid मध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील माधुरी गायकवाड ( परिचारिका),सागर निकम ( सफाई कामगार),विलास अडागळे ( बिगारी ,वैकुंठ स्मशानभूमी) ,धनंजय पुरकर ( कलाकारांना मदत करणारे) यांचा खास covid योद्धा म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.
नाट्य परिषदेचे समीर हंपी, प्रवीण बर्वे, सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते या समितीने एकमताने या पुरस्काराची निवड केली आहे.
करोना च्या कालावधीनंतर २५ नोव्हेंबर पासून नाट्यगृह सुरु करून नाट्यव्यवसायाचा पुनःश्च हरी ओम करण्याकरीता शासनाच्या नियमांना धरून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमाला नाट्य रसिकांनी उपस्थित राहून नाट्यकलेवर असलेले प्रेम व्यक्त करावे असे सुनील महाजन म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading