fbpx
Friday, April 19, 2024
Business

मध्यम वजनाच्या व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीत बॉस आणणार नवक्रांती

अशोक लेलॅंडचे नवे बॉस एलई आणि एलएक्स ट्रक्स, आय-जेन ६ तंत्रज्ञानाने परिपूर्ण

पुणे, दि. २२ – हिंदुजा समूहातील प्रमुख कंपनी आणि व्यावसायिक वाहनांची भारतातील आघाडीची उत्पादक अशोक लेलँडने बॉस एलई आणि एलएक्स ट्रक्स आज बाजारपेठेत दाखल केले.  बीएस-६ मध्ये आय-जेन ६ बीएस-६ तंत्रज्ञान हे या नवीन ट्रक्सचे खास वैशिष्ट्य आहे. मध्यम वजनाच्या व्यावसायिक वाहनांच्या विभागात बॉस हा अशोक लेलँडच्या प्रमुख ब्रॅंड्सपैकी एक आहे. हे दोन नवीन ट्रक्स ११.१ टन ते १४.०५ टन जीव्हीडब्ल्यू बाजारपेठेसाठी अगदी योग्य आहेत.  यामध्ये ग्राहकांच्या निवडीसाठी कंपनीने अनेक कॉम्बिनेशन्स उपलब्ध करवून दिली आहेत – १४ फीट ते २४ फीट लोडींग स्पॅन आणि हाय साईड डेकफिक्स्ड साईड डेकड्रॉप साईड डेककॅब चेसिसकंटेनर आणि टिपर असे बॉडी प्रकाराचेही अनेक पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत.  बॉस एलई और एलएक्स  च्या किमती १८ लाख रुपयांपासून पुढे आहेत (एक्स-शोरूम – मुंबई / दिल्ली / चेन्नई).

बॉस प्लॅटफॉर्म बहुउपयोगी आहे.  पार्सलकुरियरपोल्ट्रीघरगुती वापराच्या वस्तूकृषी-नाशवंत उत्पादनेई-कॉमर्सएफएमसीजीमोटारींचे सुटे भाग अशा अनेक वस्तूंची ने-आण करण्यासाठी यांचा वापर केला जाऊ शकतो.  यामध्ये ग्राहकांना दोन केबिन पर्याय आहेत आणि बीएस-६ तंत्रज्ञानाबरोबरीनेच ७% जास्त फ्लुइड क्षमता५% पर्यंत जास्त टायर लाईफ३०% पर्यंत दीर्घ सर्व्हिस इंटर्व्हल आणि ५% पर्यंत कमी देखरेख खर्च असे इतरही अनेक सुधारणांचा लाभ यामध्ये मिळणार आहेत.  या श्रेणीतील आघाडीचे एर्गोनॉमिक आणि चालकासाठी सुरक्षा तरतुदींसह संपूर्णतः बांधणी करण्यात आलेला पर्याय म्हणून बॉस ट्रक उपलब्ध होणार आहेत.  यासोबत आय-अलर्टरिमोट डायग्नॉस्टिक्स अशा डिजिटल सुविधा देखील मिळत आहेत.

अशोक लेलॅंडचे एमडी आणि सीईओ श्री. विपीन सोंधी यांनी सांगितले, “यंदाचे वर्ष आव्हानात्मक असून देखील आम्ही आमच्या नियोजनानुसार काम करत आहोत.  एव्हीटीआर लॉन्चपासून सुरुवात करत डिजिटल एनएक्सटी या डिजिटल सुविधाबडा दोस्त आणि आता बॉस आयसीव्ही ट्रक्स अशी आमची आगेकूच सुरु असून आमच्या ग्राहकांना सर्वात नवीन आणि अत्याधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देणे हे आमचे उद्धिष्ट आहे.  आमच्या बॉस श्रेणीमध्ये हे नवीन ट्रक्स सादर करण्यात आल्यामुळे आमची आयसीव्ही वाहने ही बाजारपेठेतील सर्वोत्तम वाहनांपैकी एक बनली आहेत.  आयसीव्हींच्या मागणीत वाढ होत आहे आणि पोर्टफोलिओमधील आमच्या सर्वाधिक विक्री असलेल्या ब्रॅंड्सपैकी एकामध्ये आमचे सिद्ध झालेले i-Gen6 BS-6 तंत्रज्ञान आणण्याची हीच उत्तम वेळ आहे.  हे नवीन ट्रक्स बाजारपेठेत दाखल करण्यात आल्यामुळे आमच्या पोर्टफोलिओची मजबुती अधिकच वाढली आहे आणि यामुळे जगातील आघाडीच्या १० सीव्ही उत्पादकांमध्ये स्थान मिळवण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करण्यात देखील मदत मिळणार आहे.” 

बॉस एलई और एलएक्स   सोबत ४ वर्षे / ४ लाख किमी अंतर प्रवासापर्यंतची वॉरंटी दिली जाते ती पुढे ६ वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते.  यासोबत कंपनी ४ तासात प्रतिसाद आणि ४८ तासात रिस्टोरेशनचे वचन देखील देत आहे.  अशा प्रकारच्या वाहनांसाठी अधिक जास्त अपटाईमची गरज असल्याचे लक्षात घेऊन यासोबत क्विक ऍक्सीडेन्ट रिपेअर‘ सेवा दिली जात असून वर्कशॉप्समध्ये यासाठी विशेष बे राखून ठेवण्यात येईल.  विक्री आणि विक्रीनंतरच्या सेवांसाठी ग्राहकांसाठी ३००० पेक्षा जास्त टच पॉईंट्स उपलब्ध असून अपटाइम सोल्युशन सेंटर आणि सर्व्हिस मंडी नेट्वर्कमार्फत २४X७ सेवा पुरवल्या जातील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading