fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे आयोजित संमेलनाध्यक्षपदी प्रा. प्रदीप कदम, प्रा. चंद्रकांत वानखेडे

पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०२१ मध्ये होणाऱ्या २२ राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ कवी, काषाय प्रकाशनाचे संचालक प्रा. चंद्रकांत वानखेडे, तर पुढील महिन्यात होणाऱ्या सातव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी दिली.


प्रा. वानखेडे यांच्या नावावर १२ काव्यसंग्रह असून, काळीजशिल्प, आई नावाचं महाकाव्य, बाप नावाचा वटवृक्ष, काव्यमाला, कृपाछत्र आणि कन्यारत्न या पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे. अलीकडेच त्यांचे बंधुतेचा अनुबंध हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. प्रा. कदम यांची आतापर्यंत पाचशेहून अधिक व्याख्याने झाली असून, छत्रपती शिवराय व आजचा समाज, छत्रपती संभाजी राजे, ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज, असे त्याच्या व्याख्यानांचे विषय आहेत. ही दोन्ही ही संमेलने पिंपरी चिंचवड शहरात होणार आहेत, असे रोकडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading