fbpx
Wednesday, April 24, 2024
PUNE

प्रियांका गांधी यांच्याशी उत्तरप्रदेश पोलीसांनी केलेल्या असभ्य वर्तनाबद्दल डॉ.नीलम गोऱ्हे यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र

बेजबाबदार उत्तरप्रदेश आमदारांच्या वक्तव्यांबद्दल त्यांच्यावरही कारवाईचीही मागणी

पुणे दि.०४:- उत्तरप्रदेश हाथरस येथील बलात्कारच्या घटनेने संपुर्ण देश हादरून गेला आहे. या पीडितला उत्तरप्रदेश पोलीसांनी पहिल्यांदा बंदी करून ठेवले त्यांना कोणाला भेटण्याची परवानगी दिली नाही. या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी काल त्या हाथरस येथे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेल्या होत्या. या दरम्यान उत्तरप्रदेश पोलीस प्रशासनाने त्यांना थांबविण्यासाठी मोठ्याप्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यातील एक पुरुष पोलीस कर्मचाऱ्याने गांधी यांच्या अक्षरशः कुर्ता पकडून ओढले. याबाबत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती यांनी खेद व्यक्त केला. याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्र लिहून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे.

बंदोबस्त दरम्यान महिला पोलीस या ठिकाणी असणे आवश्यक होते परंतु असे झाले नाही असा प्रश्न देखील यावेळी ना.डॉ.गोऱ्हे यांनी सदरील पत्रात प्रश्न उपस्थित केला आहे.
तसेच या कुटुंबाला उत्तर पोलीसांचे सहकार्य लाभत नाही परिणामी हे सर्व प्रकरण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करणारे असल्याने या कुटूंबाला केंद्रीय पोलिसांचे संरक्षण देण्यासाठी देखील विचार व्हावा असे देखील या
पत्रात म्हंटले आहे.

याघटनेत ज्याज्या अधिकारी यांच्याकडून दिरंगाई झाली किंवा ज्यांनी संवेदनहीनतेने काम केलं त्यांच्यावरती कारवाईच्या बरोबर व्हावीच. त्याचबरोबर एक महिन्याच्या आत या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याच बरोबर चांगल्या पद्धतीचे सक्षम सरकारी वकील मिळाले पाहिजेत अशी अपेक्षा डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर उत्तरप्रदेश येथील लोकप्रतिनिधी सुरेंद्र सिंह आणि रणजित श्रीवास्तव यांनी या घटनेवरून महिलांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करून महिलांनाच बदनामी करण्याचे कारस्थान या लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत असल्याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी खेद व्यक्त करून या नेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री शहा यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading