fbpx
Thursday, April 25, 2024
Business

‘पदमा ग्रुप’च्या नूतन कार्यालयाचे उदघाटन

पुणे : पदमा ग्रुप अँड असोसिएट्स मल्टिपर्पज कंपनीच्या दत्तनगर-आंबेगाव येथे नूतन कार्यालयाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक समीर पाटील आणि स्मिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अभिनेता देव गिल, मानाचा तिसरा गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, उदय कड, रितेश वैद्य, युवा उद्योजक हर्षवर्धन चोरगे, सागर पानसरे, अजय जावळे, विकास कांबळे, किरण कोल्हे विशाल साळुंके, अमोल तांबे, नरेंद्र सातपुते, सुनील महाजन, लेखक महेश थोरवेपाटील, अभिजित शिवणगे, सुशांत बाबर, ऍड. भास्कर जगदाळे, ऍड.महेंद्र पठारे, मंदार महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बांधकाम, इव्हेंट्स, सुरक्षारक्षक, होर्डिंग, प्रिंटिंग आदी क्षेत्रात पद्मा ग्रुप कार्यरत आहे. या कार्यक्रमाला आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पद्मा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading