fbpx
Thursday, April 25, 2024
Business

स्क्रीन गेम्स नाकारा आणि बोर्ड गेम्स स्वीकारा

~ नवनीत एज्युकेशनने + ते + वयोगटासाठी आणली ६ बोर्ड गेम्सची मालिका

भारतात गेल्या सहा दशकांपासून शैक्षणिक कटेण्टच्या क्षेत्रात अग्रेसर भूमिका बजावणाया नवनीत एज्युकेशन लिमिटेडने ३ ते ९ वयोगटातील मुलांसाठी अध्ययन मजेशीर करण्याच्या उद्देशाने शैक्षणिक बोर्ड गेम्स बाजारात आणले आहेत.

सध्याच्या न भूतो अशा काळात, मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी व त्याचवेळी त्यांचा दैनंदिन स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पालकांना आजपर्यंत कधीही लागले नाही इतके झगडावे लागत आहे. अध्ययनाच्या अनेकविध प्रकारांमध्ये मुलांना गुंतवून ठेवणे पालकांसाठी कठीण का आहे, हे समजून घेण्याच्या दिशेने नवनीत एज्युकेशनने केलेल्या सखोल संशोधनातून हे बोर्ड गेम्स आकाराला आले आहेत. गेली अनेक वर्षे पालक हे साध्य करण्यासाठी विविध मार्गांनी साहित्य खरेदी करत आले आहेत. नवनीतने आणलेले हे बोर्ड गेम्स एक संपूर्ण सोल्युशन देऊ करतात. यामध्ये पायाभूत गणित, भूगोल, सामान्य ज्ञान, शब्दभांडार, फोनिक्स (उच्चारशास्त्र) अशा अनेक विषयांचा समावेश आहे.

डिजिटल माध्यमांचा वापर हा संभाषण आणि अन्य मानवी स्पर्शबिंदूंची जागा घेऊ लागलेला असताना, मुलांनी व्यक्तिगत पातळीवर संवाद साधणे आणि मानसिक व सामाजिक विकासासाठी आपल्या आकलनक्षमतेचा उपयोग करणे अत्यावश्यक झाले आहे. मुलांच्या कौशल्यांचे उपयोजन करण्याचा तसेच त्यांच्या विकासाला चालना देण्याचा बोर्ड गेम्स हा प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे एकाग्रता व सृजनशीलता सुधारते, अत्यावश्यक कौशल्ये समृद्ध होतात. हे गेम्स निर्णयक्षमता, सामाजिक आंतरक्रिया आणि सखोल विचार करण्यास मदत करतात. हे सर्व घटक मुलाच्या व्यक्तिगत व सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

नवनीत एज्युकेशनचे संचालक शैलेंद्र गाला म्हणाले: “काळासोबत आपणही उत्क्रांत झाले पाहिजे असे आम्हाला वाटते. हे बोर्ड गेम्स आणून आम्ही खेळातून अध्ययनाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. हे गेम्स विविध वयोगटांसाठी आहेत, ते संवादात्मक व मजेशीर आहेत आणि त्यातून अध्ययन शक्य होते. हे गेम्स बाजारात आणणे आमच्यासाठी रोमांचक अनुभव आहे.”

नवनीत एज्युकेशनच्या चिल्ड्रन्स बुक्स विभागाच्या प्रकाशन प्रमुख प्रीती गोसालिया म्हणाल्या: तार्किक विचाराला कृतीचा आधार मिळाला की, मुलांची प्रगती होते यावर आमचा ठाम विश्वास आहे. आमच्या गेम्समुळे उच्चस्तरीय विचारकौशल्ये, आकलनविषयक स्थितीस्थापकत्व, जीवन व्यवहार आणि अन्य अनेक कौशल्ये विकसित होतील. प्रत्येक गेमचा स्वत:चा असा यूएसपी आहे. मुलांसाठी हे गेम्स मनोरंजक, गुंतवून ठेवणारे व उत्साह वाढवणारे ठरतील आणि सहभागाची चालना देणारे ठरतील.”

नवनीत एज्युकेशनने बाजारात आणलेले हे बोर्ड गेम्स समस्या सोडवण्याची कौशल्ये, व्यूहरचनात्मक विचार आणि स्मरणशक्ती, प्रतिबंधात्मक नियंत्रण व आकलनातील स्थितीस्थापकत्व आदी कार्यात्मक बाबींमध्ये मदत करण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले आहेत. हे मेंदूला चालना देणारे खेळ लहान मुलांच्या मनांना व्यायाम मिळेल व ती उत्साहित राहतील याची काळजी घेतात. यातील प्रत्येक गेम वेगळ्या संकल्पनेवर आधारित आहे:

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading