fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात आज १४ हजार ८८८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह; २९५

पुण्यात दिवसभरात १६१७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

मुंबई, दि. २६ : राज्यात ७६३७ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ८८८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७२.६९ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ७२  हजार ८७३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १४,८८८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २९५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१८५४ (२८), ठाणे- २५७ (४), ठाणे मनपा-२६८ (४), नवी मुंबई मनपा-५१९ (२), कल्याण डोंबिवली मनपा-५१७ (५), उल्हासनगर मनपा-४३, भिवंडी निजामपूर मनपा-३३, मीरा भाईंदर मनपा-१४४ (७), पालघर-१८४, वसई-विरार मनपा-१७३, रायगड-३८८ (१), पनवेल मनपा-२०५ (४), नाशिक-२४० (१), नाशिक मनपा-७१२ (१६), मालेगाव मनपा-३५, अहमदनगर-३४६ (७५),अहमदनगर मनपा-२५८ (१२), धुळे-११७, धुळे मनपा-६५ (१), जळगाव- ५१९ (१४), जळगाव मनपा-८०, नंदूरबार-१३० (२), पुणे- ५८२ (२), पुणे मनपा-१६४० (३७), पिंपरी चिंचवड मनपा-१००८ (७), सोलापूर-१६६ (१७), सोलापूर मनपा-२७ (३), सातारा-५०५ (३), कोल्हापूर-२१४ (८), कोल्हापूर मनपा-१७२ (७), सांगली-२२५ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२१७ (१५), सिंधुदूर्ग-२०, रत्नागिरी-६५ (४), औरंगाबाद-११४ (५),औरंगाबाद मनपा-२२४ (९), जालना-६१, हिंगोली-१८ (१), परभणी-३१, परभणी मनपा-४५ (१), लातूर-९३, लातूर मनपा-९० (१), उस्मानाबाद-५५ (५),बीड-८३ (८), नांदेड-१४३ (२), नांदेड मनपा-९७ (१), अकोला-२५, अकोला मनपा-२२, अमरावती-२६, अमरावती मनपा-७५ (२), यवतमाळ-१०५ (३), बुलढाणा-१०८, वाशिम-६१ (१), नागपूर-२५३ (४), नागपूर मनपा-१०१२ (३२), वर्धा-५२, भंडारा-३२ (२), गोंदिया-६० (१), चंद्रपूर-२८, चंद्रपूर मनपा-२१, गडचिरोली-११, इतर राज्य १५ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३७ लाख ९४ हजार ०२७ नमुन्यांपैकी ७ लाख १८ हजार ७११ नमुने पॉझिटिव्ह (१८.९४ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ६८ हजार ९२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६४४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२१ टक्के एवढा आहे.

पुणे शहर अपडेट

  • दिवसभरात १६१७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात १३६९ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात ४३ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. १२ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ८१२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४९२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ८७३१७.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १४९४०.
  • एकूण मृत्यू -२१०८.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ७०२६९.

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६१६४.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading