fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

डॉ. आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या आत्मनिर्भर सेलमध्ये अल्लाना आर्किटेक्चर कॉलेजचा सहभाग

पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या आर्किटेक्चर विद्याशाखेचे बी.आर्च. आणि एम.आर्च. कोर्सेस असून, या विद्यापीठाचा “मास्टर ऑफ आर्किटेक्चर इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेन्ट” हा कोर्स महाराष्ट्र कॉस्मोपोलिटोन एजुकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आझम कॅम्पस, कॅम्प, पुणे येथे शिकविला जातो. त्यामुळे आत्मनिर्भर सेलमध्येही महाविद्यालयाने सहभाग घेतला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातर्फे  नुकत्याच आयोजित कार्यक्रमात या सेलचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोशियारी यांच्या हस्ते ऑनलाईन कार्यक्रमात झाले.

भारत आज तर ज्ञान, तंत्रज्ञानाचा एक मोठा वटवृक्ष बनलेला आहे, त्याच्या सावलीत अनेक भावी अभियंते नवनिर्मितीसाठी ध्यान करीत आहे.  संपूर्ण भारत जागतिक कौशल्याचे केंद्र बनविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने स्वतःचे योगदान देत विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पनेवर जोर दिला आहे, ही अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ७४ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२० रोजी विद्यापीठाच्या “आत्मनिर्भर भारत  सेल”चे उद्घाटन करतांना केले.

केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रमाचे केंद्रीयमंत्री  प्रकाश जावडेकर हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.वेदला रामा शास्त्री यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

सर्जनशीलता वाढविण्यासाठी आत्मनिर्भर भारत सेल

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.वेदला रामा शास्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने घेतलेल्या पुढाकारांबद्दल कार्यक्रमात समजावून सांगितले. विद्यापीठामध्ये या कक्षाची स्थापना ही या दिशेने पहिले पाऊल असून संपूर्ण देशातील सर्व विद्यापीठांमध्ये ही पहिली पायरी असल्याचे त्यांनी सांगितले.  कुलगुरू म्हणाले की, युवकांमध्ये नाविन्य आणि सर्जनशीलता वाढविण्याच्या उद्देशाने डीबीएटीयूने आत्मनिर्भर भारत सेल तयार करण्याचा निर्णय घेतला.

केंद्रीय मंत्री,  प्रकाश जावडेकर यांनी आपल्या भाषणात आत्मनिर्भर भारत कक्ष स्थापन करून विद्यापीठाने केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. आत्मनिर्भर होण्याची पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे नावीन्य आहे आणि नाविन्यपूर्ण वाढ आणि सुधारणा करण्यात विद्यापीठांच्या भूमिकेचेही कौतुक केले. जगभरातील जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या नाविन्यपूर्ण कार्यात भारतीयांनी घेतलेल्या भूमिकेची काही उदाहरणे त्यांनी नमूद केली. सध्याच्या संदर्भात नवनिर्मितीचा हातभार लावण्यापेक्षा नवनिर्मितीचा मालक होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मातृभाषेचे महत्त्व सांगून आपली स्वतःची शक्ती जाणून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यांनी आत्म निर्भर भारत साध्य करण्यासाठी आत्मविश्वासाची भूमिका पुढे आणली आणि देशातील तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यात आपल्या विद्यापीठांनी मोठी भूमिका बजावावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यांनी मेळाव्यात सल्ला दिला की व्यावहारिकदृष्ट्या काम करण्याची खूप गरज आहे आणि आत्मा निर्भर भारतचे ध्येय साकारण्यासाठी आत्मनिर्भरतेसाठी श्रम करण्यावर भर दिला पाहिजे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading