fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

शहरी गरीब योजनेतील रुग्णांना संपूर्ण उपचार मिळणार मोफत

पुणे : पुणे महानगर पालिकेच्या शहरी गरीब योजनेस पात्र असलेल्या नागरिकांना व त्यांच्या कुटूबियांना कोणतीही मर्यादा न राखता सदर योजनेचा अमर्यादित लाभ मिळणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत गरजू नागरिकांना सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठीचा ठराव पुणे महानगर पालिकेच्या आज झालेल्या महिला बाल कल्याण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांनी मांडला होता.

पुणे शहरामध्ये राहणाऱ्या गोर-गरीब, गरजू व दारिद्र्यरेषेखालील नागरिकांकरिता पुणे महानगर पालिकेमार्फत शहरी गरीब योजना राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत शहरातील नागरिकांना एका आर्थिक वर्षामध्ये रुपये एक लाखापर्यंत आरोग्यसेवा पुरविण्यात येते. मात्र, सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे महामारी पसरली असून, आपल्या राज्यात व पर्यायाने पुणे शहरात अनेक नागरिकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये गोरगरीब नागरिकांची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास येते आहे. त्यातून कोरोनावरील उपचारांचा खर्च काही लाखांमध्ये होत असल्याने या लोकांना एक लाखापूढील खर्च स्वतः करावा लागतो. जे करणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे सध्या या नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कोरोना विषाणूने आजारी असलेल्या व पुणे महानगर पालिकेच्या शहरी गरीब योजनेस पात्र असलेल्या नागरिकांना व त्यांच्या कुटूबियांना कोणतीही मर्यादा न राखता सदर योजनेचा अमर्यादित लाभ देण्यात यावा, असे प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी मांडले. त्यावर सहमती दर्शवत महिला व बाल कल्याण समितीच्या उपाध्यक्षा नगरसेविका डाॅ. श्रध्दा प्रभुणे, सदस्य नगरसेविका स्वप्नाली सायकर, मंगला मंत्री, मनिषा लडकत, नीता दांगट यांच्यासह सर्व उपस्थित सदस्यांनी पाठिंबा दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading