fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRA

उस्मानाबादेत लॉकडाऊन विरोधात वंचितचे आंदोलन

उस्मानाबाद, दि.२ – येथील वंचित बहुजन आघाडीकडून सर्व तालुक्यात आंदोलन करण्यात आले. नळदुर्ग येथे जिल्हाध्यक्ष मारुती बनसोडे यांच्या उपस्थितीत व्यापारी, छोटे दुकानदार यांना लॉकडाऊनच्या विरूध्द सर्व व्यवहार चालू ठेवावेत असे आवाहन केले. त्याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

उस्मानाबाद येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गायकवाड ,
अंकुश लोखंडे, युवा नेते अंकोल वाघमारे ,वागदरी शाखेचे अध्यक्ष सुदर्शन बनसोडे यांनी व्यापाऱ्यांना व्यवहार चालू ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देऊन त्यांनी आपला दैनंदिन जीवनातील व्यवहार चालू ठेवला.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी कोरोनाच्या
नावाखाली छोट्या व्यवसाईकांचे उद्योग धंदे बंद असल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी अन्यथा आम्ही लॉकडाऊन पाळणार नाही, असा इशारा दिला होता. त्या पाश्वभूमीवर या पुढे आमचे व्यवसाय बंद करणार नाही असे व्यापारी व दुकानदार यांनी सांगीतले. बाळासाहेबांच्या आवाहनाला जिल्ह्यत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाध्यक्ष मारुती बनसोडे यांनी सांगीतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading