fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

आताच्या परिस्थितीत सामाजिक आरोग्य जपणे हा राष्ट्रधर्म –    प्रा.मिलिंद जोशी

पुणे, दि. २ – लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतु:सुत्री देशवासियांना दिली होती. मात्र, आजच्या काळात जर टिळक असते, तर त्यांनी ५ वी आरोग्यसुत्री समाजाला दिली असती. सामाजिक आरोग्य जपून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश त्यांनी दिला असता. त्यामुळे आताच्या परिस्थितीत सामाजिक आरोग्य जपणे हा राष्ट्रधर्म आहे, असे सांगत प्रख्यात वक्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टसह पुण्यातील सुमारे २१ गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिन्टन्सिंगचे नियम पाळून केसरी वाडयातील लोकमान्य टिळकांच्या संग्रहालयाला लोकमान्यांच्या १०० व्या पुण्यथितीनिमित्त भेट दिली. यावेळी पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन देखील करण्यात आले. पियुष शाह, शिरीष मोहिते, सुनील मारणे, किरण सोनिवाल, हनुमंत शिंदे, अमोल सारंगकर, प्रितम शिंदे, कुणाल पवार, वैभव रोकडे, प्रमोद राऊत, अमर जाधव, किरण शेट्टी, हर्षद नवले आदी यावेळी उपस्थित होते. संग्रहालयातील टिळकांची पत्रे, छायाचित्रे व इतर माहितीच्या आधारे कार्यकर्त्यांनी टिळकांचा जीवनप्रवास जाणून घेतला.

अष्टविनायक मित्र मंडळ, नवज्योत मित्र मंडळ, जयहिंद मित्र मंडळ, नवनीत मित्र मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ, अखिल मंडई मंडळ, सेवा मित्र मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ, त्वष्टा कासार मित्र मंडळ, जयजवान मंडळ, हिंदमाता मंडळ, शिवशक्ती मंडळ, पोटसुळ्या मारुती मंडळ, काळभैरवनाथ तरुण मंडळ, माती गणपती मंडळ, विंचूरकर वाडा, हरिहरेश्वर मित्र मंडळ, वीर शिवराज मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ आदी मंडळांनी यामध्ये सहभाग घेतला.

प्रा.मिलिंद जोशी म्हणाले, लोकमान्य टिळकांचा शब्द हा लाखो भारतीयांसाठी महत्त्वाचा होता. प्रसार माध्यमे नसताना नेतृत्व प्रस्थापित करणे कठिण काम होते. मात्र, टिळकांनी आपल्या कर्तृत्वाने ते नेतृत्व निर्माण केले. त्यामुळेच त्यांची लोकमान्य म्हणून ओळख आहे. भारत देश निर्धन, नि:शस्त्र असताना ब्रिटीशांना हादरा देण्याचे काम त्यांनी केले, त्यामुळे आशिया खंडातील पहिले पुढारी अशी त्यांची ओळख होती.

पियुष शाह म्हणाले, लोकमान्य टिळकांचे कार्य प्रत्यक्ष त्यांची छायाचित्रे, पत्रे आणि इतर साहित्यातून जाणून घ्यावी, याकरीता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकमान्यांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे कार्य पुढे नेणा-या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे विचार खोलवर रुजावे, हा यामागील उद््देश होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading