fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRA

नमो अ‍ॅपवर बंदी घाला; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई, दि. 30 – केंद्र सरकारने कालपासून ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली आहे. भारतीयांची खासगी माहिती धोक्यात असल्याचे सांगत केंद्र सरकारने ही बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अ‍ॅप देखील बंद केले पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने TikTok, Share It, Helo यासह 59 Apps वर बंदी घातल्याचे सोमवारी जाहीर केले. आयटी अॅक्टच्या कलम 69 ए नुसार सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यावर बंदी घातल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. गलवान खोऱ्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारची ही कृती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

दरम्यान, या सगळ्यानंतर मंगळवारी TikTok कडून आपली बाजू मांडण्यात आली. भारत सरकारनं जारी केलेल्या ५९ ऍप ब्लॉक करण्याच्या अंतरिम आदेशामध्ये टिक टॉकचाही समावेश आहे. आम्ही या आदेशाचं पालन करत आहोत. सदर प्रकरणी आम्हाला सरकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीचं बोलावणं आलं आहे. संरक्षित बाबी आणि डेटा प्रायव्हसीबाबतच्या सर्व अधिनियमांचं टिक टॉकनं पालन केलं असून आमच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती परदेशी आणि चिनी सरकारला देण्यात आलेली नाही. भविष्यातही असं केलं जाणार नाही. ऍपच्या वापरकर्त्यांची गोपनीयता आणि अखंडता यालाच आम्ही प्राधान्य देत असल्याचे TikTok चे भारतातील प्रमुख निखिल गांधी यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading