fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRA

वादग्रस्त वक्तव्यावरून इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल

अहमदनगर, दि. 26 – कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. इंदुरीकर महाराज यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात पीसीपीएनडिटी अंतर्गत इंदुरीकर महारांज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fb_img_15931550566902089027404768843769.jpg

सम तिथीला स्त्री-संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री-संग केल्यास मुलगी होते, असे वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी एका प्रवचनात केले होते. यावरून इंदुरीकरांवर प्रचंड टीकेची झोड उठली होती. या वक्तव्यामुळे पीसीपीएनडिटी अॅक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्यानुसार कलाम २२ चे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. त्याबद्दल त्यांना शासनाच्या पीसीपीएनडिटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस पाठवली होती. यावर इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडली होती.

त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांची नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल अशी नोटीस दिली होती. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading