राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सॅनिटाईजर डिस्पेनसिंग स्टँडचे वाटप

पुणे, दि. ११ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शिवाजीनगर भागातील ग्रामदैवत रोकडोबा महाराज देवस्थान , साईबाबा मंदिर देवस्थान , वृद्धेशवर – सिद्धेशवर देवस्थान ट्रस्ट , महावीर जैन मंदिर, १२०२ येथील दत्त मंदिर , तोफखाना येथील मशिद , पुणे महानगरपालिका समोरील शाही मस्जिदला सॅनिटाईजर डिस्पेनसिंग स्टँड मा.बाळासाहेब बोडके (मा स्थायी समिती अध्यक्ष , पुणे मनपा) यांच्या माध्यमातून आज देण्यात आले.
शिवाजीनगर भागातील सर्व धार्मिक स्थळांना हे स्टँड भेट देण्याचा बाळासाहेब बोडके यांनी संकल्प केला आहे. यावेळी शिवाजी बहिरट , बाळासाहेब चिंचवडे , सतीश चव्हाण , तानाजी शिरोळे , सुभाषराव जेधे , दादा सांडभोर , सौरभ भिलारे , प्रशांत जगताप,झाकीर शेख , बाबा शेख , आयुब शेख ,रोहित सांडभोर , मंदार बहिरट , संतोष शिर्के ,राहुल भोसले , सतीश खंडाळे , अमोल शिंदे , अनुप भिलारे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: