fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRA

११ लाख ९० हजार कामगारांची ८२६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी

मुंबई दि.५:- लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या २१ परराज्यातील जवळपास ११ लाख ९० हजार ९९० कामगारांची पाठवणी ८२६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

२२ मार्च पासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. अनेक राज्यातील कुशल, अकुशल कामगार महाराष्ट्रात लॉकडाऊनने अडकून पडले होते. त्यांच्या विनंतीनुसार लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून ८२६ ट्रेनने ११ लाख ९० हजार ९९० कामगार व मजुरांची पाठवणी त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली. या परप्रांतीय कामगारांना पाठविण्याचा सर्व तिकीट खर्च महाराष्ट्र शासनाने केला असून यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च आला.

८२६ विशेष श्रमिक ट्रेन

राज्याच्या सर्व भागातून १ मे पासून २ जूनपर्यंत  विविध रेल्वेस्टेशन वरून ८२६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे या सर्वांना पाठविण्यात आले. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश (४५०), राजस्थान(२०), बिहार(१७७), कर्नाटक(६), मध्य प्रदेश(३४),प.बंगाल(४९), जम्मू(५), ओरिसा(१७), छत्तीसगढ(६), आसाम(६) उत्तराखंड(३ ) , झारखंड(३२ ), आंध्र प्रदेश(३), गुजरात (४), हिमाचल प्रदेश (१ ), त्रिपुरा(१ ), तामिळनाडू (५ ), मणिपूर (३ ), केरळ(२), तेलंगणा(१), मिझोराम(१) या २१ राज्यांचा समावेश आहे.

३५ रेल्वे स्टेशन व ८२६ ट्रेन

राज्यातील विविध रेल्वे स्थानकांवरून या कामगारांना त्यांच्या-त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले. यात भिवंडी ११, डहाणू १,कल्याण १४, पनवेल ४५, ठाणे ३७, लोकमान्य टिळक टर्मिनस १५५, सी.एस.एम.टी. १३७,वसई रोड ३८, पालघर १२, बोरिवली ७२,बांद्रा टर्मिनस ६५,अमरावती ५,अहमदनगर ९,मिरज १०, सातारा १४,पुणे ७८,कोल्हापूर २५, नाशिक रोड ८,नंदुरबार ५, भुसावळ ३ , साईनगर शिर्डी ५, जालना ३, नागपूर १४,औरंगाबाद १२ , नांदेड ३,कुर्डूवाडी १, दौंड ४, सोलापूर ४, अकोला ४,  वर्धा १,  उरळी१२, पंढरपूर ४, सिंधुदुर्गनगरी ७, रत्नागिरी ६ चिपळूण २ या ३५ स्टेशन वरून उपरोक्त ८२६ श्रमिक विशेष ट्रेन सोडण्यात आल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading