fbpx
Thursday, April 25, 2024
NATIONAL

एनसीव्हीटीसी कोविड 19 साठी स्वयंप्रेरणेने प्रतिजैविके विकसित करणार

नवी दिल्ली, दि. ४ – विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने (एसईआरबी) हरियाणामधील हिसार येथील नॅशनल सेंटर फॉर वेटरनरी टाइप कल्चर (एनसीव्हीटीसी), आयसीएआर-एनआरसी अर्थात राष्ट्रीय पशुवैद्यकीय प्रकार संवर्धन केंद्राच्या अभ्यासाला पाठिंबा मंजूर केला आहे ज्यात कोरोना विषाणू विरोधात अँटीव्हायरल्स अर्थात प्रतिजैविकांसाठी त्यांच्या संग्रहात असलेल्या 94 लहान रासायनिक अवरोधक रेणूंची चाचणी केली जाणार आहे.

हे रेणू सेल्युलर किनेसेस, फॉस्फेटसेस आणि एपिजेनेटिक नियामक जसे की हिस्टोन मिथाइल ट्रान्सफरेज, हिस्टीन डीएस्टाईलस आणि डीएनए मिथाइल हस्तांतरण प्रतिबंधित करतात. कर्करोगामध्ये या प्रतिरोधकांचे वर्गीकरण योग्य प्रकारे दर्शविता येते तथापि, विषाणूच्या जीवन चक्रात त्यांची भूमिका माहित नाही. कोरोना विषाणू विरोधात क्रियाशील असणाऱ्या निवडक रेणूंचा संभाव्य औषध-प्रतिरोधक विषाणूंच्या निर्मितीच्या तपासणीसह त्यांच्या कृतीच्या आण्विक यंत्रणा अभ्यासात उपयोग होणार आहे.

शास्त्रीयदृष्ट्या एखादे विषाणूजन्य प्रथिनावर थेट लक्ष्य ठेवून विषाणूविरोधी औषधे विकसित केली जातात.

तथापि औषधाला प्रतिसाद न देणाऱ्या विषाणूंच्या झपाट्याने होणाऱ्या निर्मितीमुळे हे धोरण नेहमीच अयशस्वी ठरते. उच्च जीवांप्रमाणे, व्हायरल पॉलिमरेझ-व्हायरल एन्झाइम जो त्याच्या न्यूक्लिक ऍसिड (आरएनए) चे संश्लेषण करतो त्यामध्ये जनुक शास्त्रातील त्रुटी दूर करण्याची क्षमता नाही. म्हणूनच, कोरोना विषाणू सारख्या आरएनए विषाणूत व्हायरल जीनोमच्या संश्लेषणादरम्यान चुकीच्या पद्धतीने समाविष्ट केलेले न्यूक्लियोटाइड्स (व्हायरल आरएनएचे बिल्डिंग ब्लॉक्स) काढण्याची यंत्रणा नसते. जनुक शास्त्रातील त्रुटी दूर करण्याच्या क्षमतेच्या कमतरतेमुळे व्हायरल जीनोममध्ये अनुवंशिक उत्परिवर्तन जमा होते. यामुळे विषाणूजन्य प्रथिने बदलू शकतात. त्यानंतर बदललेली विषाणूजन्य प्रथिने उपलब्ध विषाणू विरोधी औषधांना प्रतिरोधक बनू शकतात. विषाणूंची ही वेगवान आणि वारंवार स्वतःला बदलण्याची विलक्षण क्षमता विषाणू विरोधातील औषधे विकसित करण्यात शास्त्रज्ञांसाठी एक मोठे आव्हान आहे.

विषाणू फक्त मानवी पेशीमध्येच प्रतिकृती बनवू शकतात. होस्ट (मानवी) पेशीमध्ये सुमारे 25,000 प्रथिने असतात. प्रतिकृती दरम्यान, विषाणू या पेशीतील प्रथिनांसह असंख्य अन्योन्यक्रिया स्थापित करतात. मानवी पेशीत प्रभावीपणे प्रतिकृतीसाठी विषाणूला 1000 हून अधिक सेल्युलर प्रथिने आवश्यक असतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading