fbpx
Thursday, September 28, 2023
MAHARASHTRA

ईपीएफओ निवृत्ती वेतनधारकांना मिळणार वाढीव वेतन

मुंबई, दि. 1 – ईपीएफओने निवृत्ती वेतनाचे परिवर्तीत मूल्य पुनर्संचयित केल्यामुळे 105 कोटी रुपयांच्या थकबाकीसह 868 कोटी रुपये निवृत्ती वेतन जारी केले आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (ईपीएफओ) च्या शिफारशीनुसार, 15 वर्षानंतर निवृत्ती वेतनाचे बदललेले मूल्य पुनर्संचयित करण्याच्या कामगारांच्या दीर्घकालीन मागणीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापूर्वी परिवर्तीत निवृत्ती वेतन पुनर्संचयित करण्याची कोणतीही तरतूद नव्हती निवृत्ती वेतनधारकांना याआधी कमी निवृत्तीवेतन मिळत होते. ईपीएस-95 अंतर्गत निवृत्ती वेतनधारकांच्या हितासाठी उचललेले हे ऐतिहासिक पाऊल आहे. 

ईपीएफओच्या  135 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 65 लाखाहून अधिक निवृत्तीवेतनधारक आहेत. ईपीएफओ अधिकारी व कर्मचार्‍यांनी या कोविड-19 लॉकडाउन कालावधीत सर्व प्रकारच्या अडचणींचा सामना केला आणि पेन्शनधारकांच्या बँक खात्यात वेळेवर पेन्शन जमा व्हावे यासाठी मे 2020 चे निवृत्ती वेतनाची प्रक्रिया पूर्ण केली.

Leave a Reply

%d bloggers like this: