नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायकोने मागितली तब्बल एवढ्या कोटींची पोटगी
बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया हिने काही दिवसांपूर्वी नवाजला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. आता घटस्फोटासह तिने नवाजकडे काय काय मागितले आहे. याची माहिती समोर येत आहे. आलियाने नवाजकडे तब्बल ३० कोटी रुपये पोटगी आणि मुंबईतील यारी रोड परिसरात ४ बीएचके फ्लॅटची मागणी केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यासंबंधीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार आलियाने नवाजकडे दोन्ही मुलांचा ताबा आणि ३० कोटी रुपये मागितल्याचे समजते. दरम्यान, आलियाने नवाजला पाठवलेली कायदेशील नोटीसची प्रत समोर आली असून यात तिने काही मागण्या केल्याचे दिसून येते. या सर्वांवर आलियाने ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.