fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

नगरसेविका नागपुरे यांच्या पुढाकारातूनसंपूर्ण प्रभागाची ‘कोविड-१९’ पूर्वतपासणी

पुणे : कोरोना व्हायरसपासून आपल्या प्रभागाला दूर ठेवण्यासाठी नगरसेविका मंजुषा दीपक नागपुरे यांनी भारतीय जैन संघटनेच्या मदतीने संपूर्ण प्रभागाची पूर्वतपासणी करून घेतली. प्रभागात घरोघरी जाऊन जवळपास ७५ ते ८० हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती लक्षणे आढळून आल्यास काही नागरिकांना पालिकेकडे पुढील तपासणीकरिता पाठवण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते दीपक नागपुरे यांच्यासह निलेश भिसे, मंगेश भुजवे, समीर महाडिक, मयूर पांगारे, दीपक महाडिक, प्रणव कुकडे आदी कार्यकर्त्यांनी उपक्रम यशस्वी करण्यात परीश्रम घेतले. 

सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाइम थिएटर असा विस्तीर्ण प्रभाग असलेल्या या भागात जवळपास सव्वा लाख लोकसंख्या आहे. त्यामध्ये हिंगणे, विठ्ठलवाडी, संतोष हॉल, सनसिटी, आनंदनगर, माणिकबाग आदी परिसराचा समावेश आहे. या भागातील सर्व सोसायट्या, झोपडपट्टी परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ताप, सर्दी-खोकला, ऑक्सिजन आदी गोष्टी तपासण्यात आल्या. नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करीत नागपुरे दाम्पत्याला धन्यवाद दिले. 

दीपक नागपुरे म्हणाले, “प्रभागात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे. पूर्वतपासणीसह समुपदेशन व जनजागृतीही करण्यात येत आहे. फिजिकल डिस्टंसिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर यासह रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. पूर्ण प्रभागात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. सहा ठिकाणी सॅनिटायझर टनेल उभारण्यात आले.”

“सुरक्षारक्षक, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार यांना फेस शिल्ड, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. शिवाय प्रभागातील गरजू व्यक्तींना धान्याच्या किटचे वाटप केले. काही ठिकाणी रोगप्रतिकारक्षमता वाढण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आर्सेनिक अल्बम ३० या औषधांचाही वाटप करण्यात आले,” असे नागपुरे यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading