कलाकारांकडून जाणून घ्या पडद्यामागील धमाल किस्से
स्वरंग मराठीचा नवा उपक्रम “किस्से बहाद्दर”

सध्या ह्या लॉक डाऊनच्या काळात सुध्दा मनोरंजन क्षेत्रात मधून प्रेक्षकांच्या साठी निरनिराळे उपक्रम केले जात आहेत. असाच एक नवा उपक्रम “स्वरंग मराठी” ह्या नव्या वहिनीने हाती घेतला आहे. विप्लवा एंटरटेनमेंटस् आणि पॅलेट मोशन पिक्चर्स ह्यांनी ह्याची निर्मिती केली असून पहिल्या भागात अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी धमाल किस्से सांगितले आहेत.
नाटकाच्या पडद्याआड, प्रयोगाच्या दरम्यान घडलेले काही किस्से रसिकांना “किस्से बहाद्दर” ह्या नव्या कार्यक्रमामधून कळणार आहेत.
संजय मोने, शरद पोंक्षे, विजय कदम, मंगेश कदम, लीना भागवत, शर्वाणी पिल्ले, अविनाश नारकर, भार्गवी चिरमुले, श्रुजा प्रभुदेसाई, ऋतुजा बागवे, शशांक केतकर आदी मान्यवर कलाकार ह्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. सचिन सुरेश ह्याने ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. ह्या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन सुश्रुत भागवत ह्यांनी केले आहे.
सोमवार, दिनांक २५ मे पासुन “स्वरंग मराठी” च्या युट्युब चॅनल व सोशल मिडिया पेज वरून ह्या कार्यक्रमाचे भाग दाखवण्यास सुरवात झाली आहे.