अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. अमित राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सागर फाउंडेशन यांच्या वतीने शिवाजीनगर, चतुश्रुंगी, औंध व बालेवाडी येथील पोलीस स्टेशनमधील पोलीस व सफाई कर्मचारी यांना १००० मास्क व ३५० फेसशिल्ड, तथा औंध येथील लेबर कॅम्प येथील १०० कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती सागर फाउंडेशनचे अध्यक्ष आर्यन विधाते यांनी दिली.
पोलीस व सफाई कर्मचारी हे आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना विरुद्ध आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा वेळी त्यांना प्रत्येकाने जितकी शक्य तितकी मदत करणे गरजेचे होते. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना देखील आपण आधार देणे आवश्यक आहे, असे मत आर्यन विधाते यांनी व्यक्त केले. या उपक्रमात प्रेम मुरकुटे, ऋत्विक पाटील, नितीन तिरवे, ओम बांगर आदींनी सहभाग घेतला.