fbpx
Monday, September 25, 2023
PUNE

पुणे येथील उमर मस्जिदच्या ट्रस्टने घेतला ऐतिहासिक निर्णय

पुणे- सध्या कोरोनाचे संकट संपूर्ण भारत भर असल्यामुळे अनेक लोकांचे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाले आहे. व लॉकडॉन मुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आशा वेळी कोंढवा भागातील उमर मस्जिद ट्रस्टने निर्णय घेतला की वर्षातून एकदा येणारा रमजानच्या पवित्र महिन्यात जे दान मशिदीला दिला जातो ते दान मस्जिदला ना देता आपण राहत असलेल्या शेजार धर्म मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो अशा लोकांना मदत करावी.

सदर मशिदीचे 6 ट्रस्टी व एकूण 250 पेक्षा जास्त सभासद आहे. व त्या सभासदांच्या वर्गणीतुन वर्षाला या मशिदीत 3 लाख पेक्षा जास्त दान या मस्जिदला मिळतो. मस्जिद मधये नमाज पठण करणाऱ्या मौलाना साहेब जे संपूर्ण वर्ष लोकांची सेवा करतात स्थानिक लोकांनच्या मुलांना कुराण शिकवतात व नमाज पठण करतात. सदर मशिदीमध्ये बांग देणारे बांगी साहेब व सफाई कर्मचारी यांच्या साठी ही रक्कम वापरली जाते.मस्जिदसाठी वर्षभर होणारा खर्च लाईट,पाणी आतील फर्निचर व इत्यादी छोट्या मोठ्या कामाचा खर्च या पैशातूनच केला जातो. हे सर्व खर्च असताना मशिदीच्या ट्रस्टींनी निर्णय घेतला आहे की या पवित्र रमजानच्या उपवासाच्या महिन्यात कोणतीच रक्कम उमर मस्जिद ला न देता आपल्या शेजारी राहणारे गोरगरीब लोकांना द्यावा जर तो अडचणीत असेल त्यांच्यावर या लॉकडॉन मुळे उपासमारीची वेळ आली असेल किंवा ते परिवार अडचणीत असेल तर तुमचा तो पैसा त्यांच्या कामात येईल. थोडीफार जे काय मदत तुमच्या माध्यमातून होईल त्याच्यातून त्यांची गरज भागेल व ते बांधव पण मग तो कोणत्याही जाती घर्मचा असो तो ही तुमच्या सोबत ईद साजरी करू शकेल.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 430 पेक्षा जास्त मशीद आहे असा निर्णय जर सर्वसंमतीने सर्व मस्जिदच्या ट्रस्टीने घेतला तर नक्कीच याचा फायदा देशाची ऐकता व अखंडता साबूत ठेवण्यासाठी साठी होईल. स्थानिक भागात राहणारे सर्व जातींचे गोरगरिबांना ही त्याचा फायदे होईल. असे मत अंजुम इनामदार, अध्यक्ष मूलनिवासी मुस्लिम मंच आणि मशीद ट्रस्ट ने व्यक्त केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: