fbpx
Thursday, April 25, 2024

Day: September 11, 2020

BLOG

‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ :कोल्हापूर जिल्ह्यात राबविणार प्रभावी मोहीम

कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील सर्व लोकसंख्येला दोनवेळा भेटी देऊन आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य शिक्षण, संशयित कोविड रूग्ण शोधणे तसेच सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती शोधून काढणे ‘स्वस्थ महाराष्ट्रासाठी’ लोकांनी लोकांसाठी चालवलेली आरोग्य मोहीम म्हणजे ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यामध्ये १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि १२ ते २४ ऑक्टोबर अशा दोन फेऱ्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्यामार्फत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

Read More
MAHARASHTRA

राज्यपालांच्या हस्ते स्मशानभूमी कर्मचारी, स्वच्छता कामगार, भाजी विक्रेते, पोलीसांसह कोविड योद्ध्यांचा सत्कार

कोरोना उद्रेकानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जीवाची पर्वा न करता आपल्या कार्याच्या माध्यमातून अविश्रांत सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस अधिकारी यांसह जनसामान्य कोविड योद्ध्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

Read More
MAHARASHTRA

पर्यावरण रक्षण आणि पर्यटनाच्या विकासासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांचा आरे दौरा

विस्तारित मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या आरे जंगलाला आज पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. आरे येथील जी ६०० एकर जागा जंगल म्हणून घोषित केली आहे. त्या जागेतील युनिट ४, २१ व २२ ला त्यांनी भेट दिली.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

मराठा समाजाच्या हक्कासाठी न्यायालयीन लढाई जिंकणारच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार मागे हटणार नाही. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार याप्रश्नी प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Read More
MAHARASHTRA

जनतेला योग्य उपचार देणे आमची सर्वोच्च जबाबदारी : ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

नागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुढील काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या व जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीच्या परिस्थितीत सर्वोच्च आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे. त्यासाठी प्रशासन, पोलीस, आरोग्य, महापालिका या सर्व यंत्रणांनी नियोजनपूर्वक एकछत्री अंमलात जबाबदारीने काम करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिले.

Read More
MAHARASHTRA

स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र ‘लिडर’

केंद्र शासनाने आज जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीमध्ये महाराष्ट्राने ‘नेतृत्व’ श्रेणीमध्ये (लिडर्स) देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. याशिवाय राज्याला स्टार्टअप सुधारणांच्या श्रेणींमध्ये अन्य तीन स्थान मिळाली आहेत.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

राज्यात कोरोना कहर सुरूच; आज सर्वाधिक 24 हजार 886 पॉझिटिव्ह रुग्ण, 393 जणांचा मृत्यू

देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. आज राज्यात दिवसभरात २४ हजाराहून अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३९३ हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १४ हजारहून अधिक रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,१५,०२३ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,७१,५६६ इतके Active रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Read More
NATIONALTOP NEWS

सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे निधन

Read More
MAHARASHTRATOP NEWS

कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स, रिसॉर्टस्, होम-स्टे सुरू होणार

राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्टस्, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आदींच्या कार्यप्रवणाबाबत पर्यटन संचालनालयामार्फत एसओपी जारी करण्यात आली आहे. मिशन बिगीन अगेननुसार आदरातिथ्य क्षेत्र सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यास अनुसरुन ही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) https://www.maharashtratourism.gov.in/ या संकेतस्थळावर जोडपत्र ए, बी आणि सीद्वारे ही कार्यप्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Read More
MAHARASHTRA

संजय राऊत यांना धमक्या देणाऱ्या कंगना समर्थकाला अटक

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना धमकीचा फोन करणाऱ्या एका व्यक्तीला कोलकाता पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी कोलकाता मधून अटक केली.

Read More
ENTERTAINMENTNATIONAL

आता कंगना रनौतची आई शिवसेने विरुद्ध मैदानात

कंगना रनौत नंतर तिच्या आईने देखील शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना भेकड अन् घाबरट आहे असं म्हणत कंगनाच्या आईने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी कंगनाच्या जीवाला धोका असल्याचा दावा देखील एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केला.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे – शरद पवार

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.  विरोधकांना राजकारण करायचं आहे आणि आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावर भाष्य केलं

Read More
PUNE

पुणे विभाग- 2 लाख 27 हजार 117 कोरोना बाधित रुग्ण बरे, विभागात कोरोना बाधित 3 लाख 7 हजार 667 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे विभागातील 2 लाख 27 हजार 117 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 7 हजार 667 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 72 हजार 563 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 7 हजार 987 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.82 टक्के आहे,

Read More
Business

रिलिक हेल्थ टेक्नॉलॉजीचा मॅक्सलिंक हेल्थकेअर कॉर्पोरेशनसोबत नवा करार

रिलिक हेल्थ टेक्नॉलॉजी, Inc. चा मॅक्सलिंक हेल्थकेअर कॉर्पोरेशनसोबत नवा करार झाला. या करारानुसार, 10 हजारांहून अधिक नवीन रूग्णांना जन्मजात टेक्सास (अमेरिका) येथील आययूजीओ केअर प्लॅटफॉर्म प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘मॅक्सलिंक’चे अध्यक्ष विजयकुमार सेठी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुजाता कुमारस्वामी यांनी दिली.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

मी घरची धुनी रस्त्यावर धूत नाही; फडणवीसांच खडसेंना उत्तर

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने टीका करत आहेत. यावर मौन बाळगलेल्या फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेत भाष्य केलं. एकनाथ खडसे भंगाळे प्रकरणावरुन सातत्याने फडणवीसांवर टीका करत होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. यावेळी खडसेंच्या ड्राय क्लिनरच्या टीकेवरही उत्तर दिलं आहे.

Read More
ENTERTAINMENT

‘शहीद शिरीषकुमार’ यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर

भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधींनी १९४२ मध्ये ब्रिटिशांविरूद्ध ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू केले. त्यावेळी त्यात लहानथोरांपासून अनेकांचा समावेश होता. नंदुरबारमधील १५ वर्षीय बालक्रांतिकारक ‘शिरीषकुमार मेहता’ यांनी देखील या चळवळीत हौतात्म्य पत्करले. त्यांच्या हौतात्म्याच्या स्मृती जागवणारा ‘शहीद शिरीषकुमार’ हा मराठी चित्रपट भावेश प्रोडक्शन्सतर्फे तयार केला जाणार आहे.

Read More
PUNE

ताल ,लय ,ठेका यामागे गणित : कीर्तनकार चारुदत्त आफळे

‘कीर्तीचे गायन म्हणजे कीर्तन ,मनोरंजनाबरोबर प्रबोधन देखील कीर्तन या माध्यमातून केले जाते.  ताल ,लय ,ठेका यामागे गणित आहे. आयुष्याचे ,जबाबदारीचेही गणित लक्षात घ्यावे लागते . दिवसाचे गणित मांडावे लागते. ते समजून घेण्यासाठी गणिताचे मानस आपल्याला तयार करावे लागेल,असे प्रतिपादन  कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.

Read More
PUNE

रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज आयोजित ‘गणेश मुर्ती निर्मिती’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण

रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज’ द्वारे आयोजित ‘गणेश मुर्ती निर्मिती’ स्पर्धेमध्ये अवनी वडपल्लीचा प्रथम क्रमांक आला,ओम भावसारचा द्वितीय क्रमांक आला.या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला

Read More
PUNE

लोककलेचा प्रसार होण्यासाठी चित्रपट हे चांगले माध्यम – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर

माझ्या चित्रपटात लोककलेचा मोठा भाग असतो. अभंग, गोंधळ, जोगवा अनेक गाजलेली गीते ही लोककलेचा आधार आहेत. चित्रपटांमध्ये लोककलांचा समावेश करण्याचे महत्त्वाचे कारण हेच आहे की, चित्रपटातून येणाऱ्या गोष्टींना ग्लॅमर असते आणि त्याचा प्रसार वेगाने होतो. म्हणून लोककला चित्रपटात घेतली जाते. लोककलेचा प्रसार करण्यासाठी चित्रपट हे चांगले माध्यम आहे. असे मत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केले.

Read More
PUNETOP NEWS

जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन सुरळीत ठेवावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्‍पष्‍ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Read More